अरूण & चित्रा म...'s profileMANOHAR-CHITRBlogLists Tools Help
August 09

Udghatan

 

उध्गाठन

 

उन्हाची तिरीप सोसवेना तेव्हा लुकण्या आंब्याच्या डेरेडार सावलीखाली येऊन टेकला. झाड आहे तोवर सावलीचे सुख मिळणार. नंतर मोठी सडक बरोब्बर लुकण्याच्या शेताचे दोन तुकडे करीत जाणार. आणि शेताचा दमदार पट्टा गिळणार. त्यात हे डेरेदार झाडपण सपाट करून जाणार.

 

आता ही मोठी सडक केव्हा येते कोण जाणे. जिल्ह्याहून मोठया सायबाबरूबर आणखी दोनचार पार्टी येऊन मोजमाप करून गेले होते. त्याच वेळी पाटलाले सांगीतल की कसही करून माज्या शेताले तोडू नका. जरा बाजूनी काढायला सांगा की. निदान माजे झाड तर वाचेल. असे सांगतांना लुकण्याचा आवाज ढिला पडला होता. झाडाच्या दुसया अंगाला पाटलाचे शेत होते. पाटलाने लुकण्याला चांगलाच दम दिला. त्या सायबासमूरच. कशाला गावाच्या इकासात धन्ड घालतो म्हनाला. हा सडकेचा पिलान म्हणे थेट राजधानीतून आला होता. त्यात कोणीच काही बदल करू शकणार नाही. लुकण्याचे उगाच आवाज केला तर काही उपेग होणार नाहीच उलट त्याचेच नाव बदनाम होईल.

 

तसा आधीपासूनच पाटील लुकण्यावर खार खाऊन होता. कारण पाटलाच्या बापाच्या येळी ते शेत पाटलांचे होते. कुळकायद्यात ती जमीन गेली. हा इतिहास लहानपणी पाटलाने ऐकला होता. तेव्हापासूनच मिळेल संधी तेव्हा पाटील लुकण्याला  खाली पाडायला पहात असे.

 

पाटलाने लुकण्याला फटकारले. उगाच येडेपना करू नगस. मुकाट शेताच्या कागदावर अंगठा लाव. तुला सरकार त्याचे दाम मोजणार हाय की. लुकण्याचे सह्या केलेले कागद घेऊन पाटील सायबाला घेऊन गेला. रात्री सायबाला पाटलाने कोंबडीचे जेवान दिले. दुस-या दिवशी शेतावरच्या खंडया कुत-यासाठी पाटलाने उरलेली हाडके पाठवली म्हनून लुकण्याला हे समजले.

 

आंब्याच्या बुंध्याला टेकलेला लुकण्या आठवत राह्यला. माता-याने लहानपणी ह्ये रोप लावलेले. प्रेमाने पानी पाजून ह्यो मोठा जीव फोफावला. सा-या गावाने फुकटात आंबे खाल्ले. आता तालुक्याहून मजूर येऊन आंबा कापणार. पार नस्तनाबूद करणार. शेतामधून मोठी सडक जानार. म्हनजे ह्या बाजूने त्या बाजूच्या शेतात जा ये करायला सारकी सडक पार करावी लागनार. मध्ये आंब्याची प्रेमळ सावलीबी नसनार.

 

पुढे गोष्टी कशा भराभरा उरकल्या. दोन महीन्यात लगालगा मानसे येऊन तो डेरेदार आंबा कापून गेले. अगदी मुळे पण खणून काढली. माता-याने पेरलेल्या कोयीची मुळे धा ईस फूट आतपर्यंत गेली होती. शेताचा तो पट्टा सपाट करून मुरूम टाकल्या गेला. अन मग लगालगा आली तशी लगालगा मजुरं परत गेली. दोन चार दिवस गजबजलेले लुकण्याचे शेत आता पुन्हा एकले झाले. आंब्यावरच्या कोकीळेचा आवाजही ते मजूर घेउन गेले. लुकण्या भकास पने मुरमाड पट्टा निरखत बसायचा.

 

आला दिवस गेला. एकदा पाटलाने गावातून जाणा-या मोठया सडकेचे उधघाठन आहे असे सांगीतले. गावच्या धा लोकांना टरक मधे बसवून जिल्याला नेले. लुकण्याला पण चानस मिळाला. मंच सजवला होता. रंगीबेरंगी पताकांनी कचेरी समोरच मैदान सजवल होत. राजधानीतून मंतरी आले. बीडीओ सायबाने त्यांना हार घातला. मंतरी सायबाने लांबलचक भाशन ठोकले. गावांचा इकास करन्याच्या सरकारच्या प्रपंचाविषयी मंत्री काहीतरी बोलत होते. उद्गाठन सबारंब दणक्यात पार पडला. धूळ उडवित मंतरी निघून गेले. मोठया सडकेच्या कामाबद्दल तर काही बोलले न्हाय अस पाटलाला इचारल तर म्हनाला अरे ह्या मंतरी लोकाइच बोलन असच चिकन चोपड असत. तेंना पोलीटीकली सर्वांना सांबालून घ्यायच असत. तुला भैताडा काय कलनार मोठया लोकांची भाशनं. ते जाऊ दे. सडक येनार म्हनजे येनार.

 

बघता बघता दोन तुकडे जालेल्या शेतात लुकण्याची चार पिके पण घेउन झाली. सडक अजून येतच होती. जिल्हयाला पोहोचली होती मने. पण पुढे याया काय रूसून बसली देवास ठावे. मुरमाड पट्टा कधी लाल होता असे आता सांगूनही पटले नसते. त्यावर शेतातली माती साठली. गवत माजले. चार दोन बक-या तिथे चरू लागल्या. सह्या केलेले कागद नंतर कधी दिसले नाही ना कोणी लुकण्याला पैसे दिले. लुकण्याने पता लावला. सडकेच्या आजूबाजूच्या इतर शेतक-यांना पैसा नाही तरी शेताचे कागद वापस मिळाले होते.

 

पाटलाला चारदा इचारून तो काही थांग लागू देइ ना. उलटा डाफराया लागला. तुले काहून जल्दी पडलीय बे. लुकाण्याने कागदांसाठी जरा जास्तच घोषा लावला. तेव्हा पाटलाने सांगीतले तिकडे कचेरीत तुझ्या कागदांचा काही घोळ झालेला असणार. पण काळजी करू नगस. मोठी सडक इकडे येइस्तोवर मी आणून देतो तुला कागद. तोवर करत रहा ना तू शेती. आंबा लावायचा असेल तरी पुन्हा लाव.

 

मोठी सडक येतच राह्यली. लुकाण्याने दुसरे आंब्याचे झाड लावले आणि शेतीच्या रोजच्या कामाला लागला.

.....................

.....................

 

सोप्यात ऐसपैस बसून पाटील शहरात वकीली शिकून आलेल्या मुलाला आपल्या इस्टेटीचे कागद दाखवत होते. लुकाण्याचेही कागद त्यात होते. शेत पाटला कडे गहाण ठेवल्याचे कागदपत्र पाहून त्याने पाटलाला इचारले.

 

आबा आता लुकाण्याचे शेत गहाण ठेउन बराच काळ गेला. अजून तुमचे कर्ज वापस आले नसेल तर शेत ताब्यात तरी घ्या.

अरे राहू दे. बिचारा गरीब त्यावर पोट भरतोय.

अहो आबा अशी ढिलाई करून कसे भागेल. व्यवहार तो व्यवहार.

व्यवहार ठीक आहे रे. पण योग्य वेळीस तो तुलाच करावा लागेल.

ंम्हणजे?

ंमी आहे तोवर राहू दे शेत त्याच्याकडे. माझ्यामागे कर तू ह्या कागदाचे उधघाठन  पाटील मिशीवर ताव देत बोलले.

 

अरूण मनोहर   सिंगापूर  तीन जुलै दोन हजार सहा

 

 

May 30

प्रुथ्वी वरच्या पाकक्रुती

श्रीखंड
मलाई भरले दही तलम कापडी टांगुनी
निथाळुनी जला समग्र गठडी पुरी दाबुनी
पराति शर्करा चक्का मिसळुनी अहा फ़ेटले
इलायची सुगंध घालुनि श्रिखंड हे वाटले
 
 
भजी
पिठात चिरले कान्दे मिसळुनी जला ओतले
चवीस मिठ मीरची मिळुनि घोळ फ़ेटीयले
कढाइत भरूनि अन् आच त्या लावुनी
भज्यास तळले गर्मागरम काढले बाहरी
 
 
गुलाबजामुन (मावा बाटी)
दुधास अटवु खवा करुनि त्या मळावा पुरा
करोनि तवगोलकांस तळणी तळावा बरा
मधूर रसि डूबवूनि सम गोलकांना अरे
गुलाब जमना त्वरीत चखुनी जरा पाहिरे
 
 

अरूण & चित्रा मनोहर

Occupation
Location
मराठी साहित्य, कविता ह्यात रस आहे. भरपूर लिखाण केले आहे.
No list items have been added yet.